Thursday, August 27, 2026
Homeसिंदेवाहीसिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने तातडीने माकडांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गुरुवारी ९ जुलैच्या सकाळी सुमारे साडे सहा वाजता शहरातील आंबेडकर चौक(प्रभाग क्र.८)परिसरातील २६ वर्षीय शुभम विलास रामटेके हे घराच्या गच्चीवर ब्रश करत उभे असतांना माकडांच्या टोळीतील एका माकडाने अचानक झडप घालून त्यांच्या कमरेला चावा घेतला.या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.त्यानंतर परत आज,रविवार १२ जुलैच्या सकाळी पुन्हा आंबेडकर चौक परिसरात जिजाबाई नागरे यांच्यावर माकडाने हल्ला चढवून त्यांच्या मांडीला घाव केला.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.माकडांच्या हैदोसामुळे महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडतांना धास्तावलेले आहेत.
सिंदेवाही शहरात माकडांचा वावर गेल्या काही दिवसांपासून वाढला असून ते घरांच्या गच्च्यांवर, झाडांवर तसेच रस्त्यावर मुक्तपणे फिरत आहेत. नागरिकांवर अचानक हल्ले होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने वनविभागाने तातडीने माकडांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे,तसेच नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.वेळेत ठोस पावले उचलण्यात आली नाहीत,तर आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!