Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीआता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. - दारू...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार बियरचा प्याला मिळतोय.यांस जबाबदार कोण? दारू पिणारे की,विक्रेते. हे सर्वकाही कृपेनेच सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे,आता कळलेय भावा? अवैध दारू कां बंद होत नाही तर..अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
  • अवैध दारूचा पुरवठाधारक कोण?👇
काही ठिकाणी गावठी मोहफुलाची दारू घरच्या घरीच काढली जाते.कारण ती घरचीच खेती असल्यासारखी आहे.पण,गावातील एखाद्या विक्रेत्याला देशी,विदेशी आणि बियरची विक्री करायची असेल तर तो स्वतः एखाद्या भट्टीवर जाऊन एक पेटी वा त्यापेक्षा अधिकची दारू आणणार नाही.यात मोठी रिस्क घ्यावी लागते. त्यामुळे,असा विक्रेता हा अधिकृत अवैध दारूचा पुरवठा करणाऱ्या दारू पुरवठाधारकांकडूनच दारूच्या पेट्या बोलावतो.दारूचा पुरवठाधारक कोण?तर असा व्यक्ती ज्याला काही गावे दारूचा सप्लाय करण्यासाठी दिली जातात.
  • अवैधरित्या दारू पुरवठ्याचा खेळ👇
दारू सप्लायरची एका ठिकाणी बोली लागते.त्यात महिन्याकाठी कमी रक्कम देणाऱ्यांना लहान गावे,तर मोठी रक्कम देणाऱ्यांना मोठ-मोठी गावे अवैध दारूचा पुरवठा करण्यासाठी दिली जातात.यात वरचा साहेब मालामाल बनतो,तर खालचा साहेब चिल्लर खुर्दा जमा करून खुश राहतो.लाखो रुपयांचा महिना ठरला रे ठरला की,दिवस असो वा रात्र अवैध दारू पुरवठ्याचा खेळ होतो सुरू.
  • इतरांची नो एंट्री 👇
गावातील दारू विक्रेत्यांना अवैधरित्या दारूचा पुरवठा करणाऱ्या पुरवठाधारकांचा एकदा कां सिलेक्शन झाला रे झाला,तर इतर दारू सिकंदरांना त्या गावांमध्ये दारूचा पुरवठा करण्यासाठी नो एंट्री असते.समजा एखाद्याने दारूची एक पेटी जरी एखाद्या विक्रेत्याला नेऊन टाकली,तर त्याचा जिना हराम केल्या जाते.त्यामुळे एंट्री फी भरल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.
  • साहेब दोन्ही बाजूंनी मालामाल👇
साहेबाचा काय आहे,साहेब तो साहेबच.इकडे अवैध दारूच्या ठेक्यातून आणि तिकडे चिल्लर खुर्दा जमा करणाऱ्यांकडूनही चहापाणी गोळा करून मालामाल बनतो.त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असूनही दारूचा महापूर वाहतोय.समजा वरच्यांनी एखाद्या अवैधरीत्या दारूचा पुरवठा करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्याच,तर दुसरा ठेका,तिसरा ठेका काही कालावधीतच तयार असतो.त्यामुळेच तर काहीजण गडचिरोली जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे नावच घेत नाही आणि दारू बंदी ही केवळ नावापुरतीच दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!