Thursday, August 27, 2026
Homeब्रम्हपुरीयालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती बनवू लागला आहे.त्यामुळे लखपती पासून करोडपती व्हायचे असेल आणि मोठ-मोठ्या प्रकरणातून सुट मिळवायची असेल तर राजकारण्यांचा शेला धरून राहणे आजच्या घडीला गरजेचे झाले आहे.अशातच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा राज्याच्या विधानसभेत गाजला.मुद्दा गाजला खरी,पण ज्यांनी मुद्दा उचलून धरला ते स्थानिक आमदार नाहीत,तर भारतीय जनता पक्षाचे नागपूर मध्य मतदार संघाचे आमदार प्रवीण दटके.त्यांनी अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा उपस्थित करत थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जाब विचारला.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची(एनजीटी) परवानगी संपल्यानंतरही तब्बल १७ महिने रेतीचे उत्खनन सुरू राहिले,जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली, तहसीलदारांनी घाटांची पाहणी करून अहवाल सादर केला,त्यानंतर सुमारे ५५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.मात्र,आजपर्यंत त्या दंडातील एक रुपयाही वसूल झालेला नाही.उलट संबंधित ठिकाणी गैरप्रकार सुरूच असल्याच्या तक्रारी आहेत.मग या चौकशी अहवालांवर शासन नेमकी कोणती कारवाई करणार?असा थेट प्रश्न दटके यांनी उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देतांना महसूलमंत्र्यांनी प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.मात्र,जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? रेती माफियांवर स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता,असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.पण,ज्याच्या नावातच दडलाय राज आणि कारण त्यालाच तर म्हणतात खरे राजकारण.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!