Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय.. -परराज्यातील तीन महिलांची सुटका; मालक फरार.

ब्रम्हपुरीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय.. -परराज्यातील तीन महिलांची सुटका; मालक फरार.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शिक्षण,वैद्यकीय सुविधा आणि इतर बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाने भांडाफोड करून मसाज सेंटर चालविणाऱ्या मॅनेजरला (व्यवस्थापक)अटक केली,तर परराज्यातील तीन महिलांची यातून सुटका केली.प्रकरणी मसाज सेंटरचा मालक फरार झाला.२४ वर्षीय मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर रा.पांजरेपार,ता.नागभीड,जि.चंद्रपूर यास ब्रम्हपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.तर मसाज सेंटरचा आरोपी मालक प्रितेश बुर्ले,रा.भवानी वॉर्ड,ब्रम्हपुरी हा अद्याप फरार आहे.आरोपी मॅनेजर यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा तसेच ब्रम्हपुरी पोलीस ठाणे यांनी काल शनिवारी संयुक्तरीत्या कारवाई केली.
चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकास ब्रम्हपुरी शहरातील एका मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार,काल शनिवारी ब्रम्हपुरी शहरातील नागभिड रोड मार्गावरील गीत पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या शेषनगर येथील ‘माय हेल्थ प्रो स्पा ॲण्ड वेलनेस सेंटर’ येथे बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली असता अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.लागलीच विशेष पोलिस अधिकारी,महिला पंच,समाजसेविका आणि बनावट ग्राहक यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. कारवाईत मिझोरम व नागालँड राज्यातील तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.तर मसाज सेंटर येथून रोख रक्कम, मोबाईल, रजिस्टर,पावती बुक,स्कॅनर,कंडोम पाकिटे असा एकूण १८ हजार ६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५७ अंतर्गत कलम ३,४,५ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,तर कारवाईत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, ब्रम्हपुरी ठाण्याचे ठाणेदार प्रमोद बानबले,पोलीस उपनिरीक्षक शितल खोब्रागडे,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,सर्वेश बेलसरे पोलीस हवालदार,नितेश महात्मे,छाया निकोडे,निराशा तितरे,अपर्णा मानकर, प्रफुल्ल गारघाटे,प्रदीप मडावी,अजित शेन्डे,सुमित बरडे, दिनेश आराडे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि समाजसेविका सरिता मालु,माया मेश्राम,हर्षा वानोडे यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!