Sunday, July 19, 2026
Homeनागपूरमोबाईल मागण्यावरून राग; आठवीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास.. - उद्याला होते आत्याच्या मुलीचे...

मोबाईल मागण्यावरून राग; आठवीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास.. – उद्याला होते आत्याच्या मुलीचे लग्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-दोन दिवसांनी आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने आठव्या वर्गात शिक्षण घेणारी दिव्या आणि तिचे आई-वडील तसेच कुटुंबीय दिव्याच्या आत्याच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते.दिव्याच्या आत्याचे घर हे
तिच्या घरापासून काही अंतरावर आहे.दिव्याने संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुटुंबीयांना मोबाईल मागितला.मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली आणि रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ घरी गेली.घरी कुणीच नसल्याने तिने घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सावनेर तालुक्याच्या चनकापूर येथील जय भोले नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी घडली. दिव्या सुरेश कोठारे वय १३ वर्षे, रा.वॉर्ड क्रमांक-६, हनुमान नगर,चनकापूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती चनकापूर येथील वॉर्ड क्रमांक-१ मधील महात्मा फुले शाळेत इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत होती.महवाचे म्हणजे,उद्या,सोमवार २४ नोव्हेंबर रोजी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न होते. मात्र,क्षुल्लकशा कारणाने लग्नाचा आनंद क्षणात दुःखद घटनेत बदलून गेला.मृतक दिव्या ही बऱ्याच दिवसांपासून मोबाईलचा अतिवापर करत असल्याने काही दिवसांपूर्वी तिच्या काकांनी मोबाईल कमी वापर, अभ्यासाकडे लक्ष दे,असे सांगितले होते.घटनेने आई-वडील तसेच नातलगांना मोठा मानसिक धक्का बसला असून कोठारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!