Sunday, May 31, 2026
Homeब्रम्हपुरीवैनगंगा नदीपात्र ओलांडून कोंढाळाच्या बाजूला आले; दोघे तरुण आंघोळ करतांनाच नदीत वाहुन...

वैनगंगा नदीपात्र ओलांडून कोंढाळाच्या बाजूला आले; दोघे तरुण आंघोळ करतांनाच नदीत वाहुन गेले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-सात ते आठ तरुणांनी गावानजीक असलेल्या वैनगंगा नदी तीरावर पार्टी करण्याचा बेत आखला खरी,पण सदरची पार्टी दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव-खरकाडा वैनगंगा नदीपात्रात घडली.आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.शुभम पुष्पराज बगमारे वय २४ वर्षे व शुभम विजय सहारे वय १९ वर्षे असे नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणांची नावे असून दोघेही चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा गावातील रहिवासी आहेत.
ब्रम्हपुरी तालुक्याच्या रणमोचन,खरकाडा व पिंपळगाव ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसलेली असल्याने बरेचसे नागरिक,महिला मंडळी तसेच तरुण -तरुणी नदी तीरावर जात असतात.उन्हाळ्याच्या दिवसांत नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने अनेकजण पलीकडच्या गावातून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावाकडे भाजीपाला तसेच इतर साहित्य विक्रीसाठी आणत असतात.मात्र,पिंपळगाव-खरकाडा नदी घाटावर पाण्याची पातळी नेहमी वाढलेली असते. त्याचबरोबर,त्या ठिकाणी डोह असल्याने अनेकजण पिंपळगाव-खरकाडा नदी पात्रातून जाण्याचे टाळत असतात.अश्यातच खरकाडा गावातील सात ते आठ तरुण काल रविवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदीच्या तीरावर पार्टी करण्यासाठी गेले होते.त्यानंतर काही जणांनी आपण नदी पात्राच्या पलीकडे जाऊन पार्टी करू म्हणून सर्व तरुण नदीपात्र ओलांडून कोंढाळाच्या बाजूला आले.सर्वांचे जेवण आटोपल्यावर परत जात असतांनाच काहीजण पिंपळगाव-खरकाडा हद्दीतील नदीपात्रात आंघोळ करत होते.राज विजय सहारे,गौरव कैलास वाघधरे,शुभम बगमारे व शुभम सहारे हे तरुण सुध्दा नदीपात्रात आंघोळ करायला उतरले.पिंपळगाव- खरकाडा हद्दीतील नदीपात्रात डोह असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम बगमारे व शुभम सहारे दोघेही तरुण वाहुन गेले.तर राज विजय सहारे,गौरव कैलास वाघधरे हे दोन तरुण सुखरूप बाहेर पडले.सदर घटनेची माहिती मिळताच खरकडा-पिंपळगाव गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी व आरमोरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपासकार्य सुरू केले.मात्र,अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.परत आज, सोमवार २ मार्चला शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!