Saturday, October 3, 2026
Homeचंद्रपूरमादी बिबट्याच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

मादी बिबट्याच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक-२३४ राखीव वनामध्ये गुरुवार,१३ ऑगस्ट रोजी एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली.प्राथमिक अंदाजानुसार,या मादी बिबट्याचा मृत्यू दोन वन्यप्राण्यांच्या झुंजीत झाल्याचे सांगण्यात आले.या बाबतची माहिती होताच सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार-बोरावार वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळावर अंदाजे चार वर्षे वयाच्या बिबट्या (मादी) मृतावस्थेत असल्याचे दिसून आले.त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती भ्रमणध्वनीव्दारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.माहिती मिळताच घटनास्थळावर ब्रम्हपुरी वनविभागचे उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी एस.आर.,सहाय्यक वनसंरक्षक(प्रादेशिक व वन्यजीव) अरविंद जे.,चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकार,तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूरचे शितलकुमार भांडारकर,स्वॉब नेचर फाऊंडेशनचे जिवेश सयाम, बायोलॉजीस्ट राकेश अहुजा आदी उपस्थित झाले.त्यांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.शवविच्छेदनादरम्यान मादी बिबट्याच्या पाठीवर तसेच समोरील उजव्या पायावर गंभीर जखमा आढळून आल्या.या जखमा इतर  वन्यप्राण्यासोबत झालेल्या संघर्षातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!