Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीनागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारी व निवेदने विहित प्रक्रियेनुसार सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून नियमितपणे सुनावणी घेण्यात येते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या तक्रारदारांनी प्रथमतः संबंधित तालुका स्तरावरील लोकशाही दिनात तक्रार सादर केलेली असणे आवश्यक आहे.तालुका स्तरावर तक्रारीचे निराकरण होऊन प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यासच संबंधित तक्रारदारांना जिल्हास्तरावर अर्ज सादर करता येणार आहे.
तक्रार अर्जासोबत तहसिलदारांनी दिलेल्या उत्तराची प्रत तसेच तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत जोडणे बंधनकारक राहणार आहे.लोकशाही दिनात केवळ वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी अथवा निवेदनेच स्वीकारली जाणार आहेत.नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करून लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!