Friday, July 10, 2026
Homeगडचिरोलीनो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी उडवला ड्रोन; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी उडवला ड्रोन; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेकपोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच या घटनेदरम्यान काही नागरिकांनी तिघांना डांबून ठेवले होते,या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये,असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केले आहे.
गुरुवार ९ जुलै २०२६ रोजी दुपारी ड्रोन उडविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता संबंधितांकडे परवानगी नसल्याचे आढळले. शिवम कळोळे,सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ नोंदविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी दिली.
तसेच याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले की, चामोर्शी परिसरात भूमी संपादनाला दोन महिन्यांसाठी स्थगिती असून,सध्या त्या संदर्भात कोणतीही प्रशासकीय कारवाई सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा व सुरक्षा व्यवस्थेची पायमल्ली करू नये.कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून,कायदा हातात घेण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,असाही इशारा देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज नगरीत जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने प्रबोधनकार श्रीकृष्णा शालीकराम धोटे श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय...

देसाईगंज येथे आरपीआयची बैठक संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच आंबेडकरी विचारांचा मुळ पक्ष असल्याने बाबासाहेबांची विचारधारा पुढे नेणे गरजेचे झाले आहे....

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर...

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!