Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीचामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांसाठी शंभर टक्के पत्र्याचे स्टॉल...

चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांसाठी शंभर टक्के पत्र्याचे स्टॉल योजना.. – गटई कामगारांनी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती करणारे गटई कामगार हे रस्त्याच्या कडेला उन्हा-पावसात बसून सेवा देतात.त्यांना ऊन,वारा व पावसापासून संरक्षण मिळावे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळावी,यासाठी शासनाच्या १०० टक्के अनुदानातून पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा लाभ आता ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रासोबतच अ वर्ग व ब वर्ग नगरपालिका,छावणी क्षेत्र(कॅन्टोन्मेंट बोर्ड)आणि महानगरपालिका क्षेत्रातील पात्रांना देखील मिळणार आहे.
सामाजिक न्याय भवन येथे कार्यालयात या योजनेचे अर्ज उपलब्ध असून अनुसूचित जातीतील गटई कामगारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.
अर्जासोबत अर्जदाराचा अधिकृत जातीचा दाखला, मागील आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,रेशनकार्ड व आधारकार्डाच्या प्रत, अर्जदार ज्या जागेत स्टॉल उभारणार आहे त्या जागेचा भाडेपट्टा,करारनाम्याची प्रत किंवा खरेदी खत, ग्रामसेवक वा सचिव यांनी दिलेले गटई कामाचे प्रमाणपत्र,व्यवसाय प्रमाणपत्र,ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय करतांनाचा फोटो,तसेच अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.अर्ज शासन निर्णयात नमूद अटींनुसार व विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक आहे.
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती संवर्गातील असावा.ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४० हजार रुपये व शहरी भागातील उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे.स्टॉल उभारण्याची जागा ही संबंधित ग्रामपंचायत,नगरपालिका किंवा छावणी बोर्ड यांनी अधिकृतरीत्या भाड्याने,कराराने किंवा मोफत ताब्यात दिलेली असावी.या योजनेत पात्र अर्जदारांनी आपले परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,गडचिरोली येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!