Thursday, May 21, 2026
Homeगडचिरोलीवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १४.४६ लाखांचा दंड वसूल..

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १४.४६ लाखांचा दंड वसूल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मागील पंधरा दिवसांपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.या कालावधीत एकूण ६१५ प्रकरणे नोंदवून संबंधितांकडून १४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत हेल्मेट न वापरणाऱ्या २२ वाहनचालकांवर, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्या १२ जणांवर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ७२ चालकांवर तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्या ६४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.याशिवाय वेग नियंत्रक नसलेल्या १२ वाहनांवर,ताडपत्रीविना मालवाहतूक करणाऱ्या २१ वाहनांवर,मागील सुरक्षा संरचना(आरयुपीडी)नसलेल्या ३५ तसेच बाजूची सुरक्षा संरचना(एलयुपीडी)नसलेल्या १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या १३ वाहनांवर,वैध परवाना नसलेल्या २७ चालकांवर,परावर्तिका नसलेल्या ८२ वाहनांवर तसेच धोकादायक ‘डॅझलिंग लाईट’ वापरणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या ७,नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्या ३७,मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ७ तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करणाऱ्या १६ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.तसेच अतिभार वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर,अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १३ वाहनांवर,ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या १४ जणांवर तसेच नोंदणी क्रमांक नसलेल्या १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. अग्निशामक यंत्रणा व फर्स्ट एड किट नसलेल्या २३ वाहनांवर तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधा नसलेल्या १३ वाहनांवरही दंड आकारण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहन चालकांचे समुपदेशन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक-२०२६ संपन्न; राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध.. – शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाचा खरीप हंगाम एल निनो,बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून,शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा,योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा...

बसचा अपघात; तिघांचा मृत्यू,तर अनेक प्रवाशी जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एसटी महामंडळाच्या बसचा आज, गुरुवारच्या सकाळी भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला,तर ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना गडचिरोली-चंद्रपूर...

लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेली ‘ती’ परतलीच नाही; १८ वर्ष व्हायला अवघे १५ दिवस होते बाकी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-पाच दिवसांपूर्वी घरा शेजारी असलेल्या एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी अजूनपर्यंत घरी परतली नसल्याने कुटुंबीयांना मुलीची चिंता सतावत आहे.विशेष...

रब्बी धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-परिसरात रब्बी हंगामातील धानाची कापणी झाली असल्याने मोठ्या प्रमाणात धान विक्री करीता बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.मात्र,शासनाकडून अद्यापही धान खरेदीसाठी आवश्यक गोदामांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!