Friday, October 9, 2026
Homeगडचिरोलीतब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. - पदांनुसार मासिक वेतन मिळणार...

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने येत्या,मंगळवार २६ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरचा रोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शिवाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,नवीन बस स्टँडजवळ, गडचिरोली रोड,चामोर्शी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित खाजगी कंपन्या सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील एकूण दहा पदांसाठी ४३४ रिक्त जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.या मेळाव्यात दहावी,बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण,आयटीआय,डिप्लोमा,पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत.उमेदवारांचे वय किमान १८ ते कमाल ५० वर्षांपर्यंत असणे अपेक्षित आहे.
मेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित पदांनुसार मासिक वेतन किमान १६ हजार रुपयांपासून ते कमाल ५० हजार रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी हा रोजगार मेळावा मोठी संधी ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडेटा/रिज्युमसह शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेऊन प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी gadchirolirojgar@gmail.com या ई-मेलवर अथवा 7843048249 व 8788257016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!