Tuesday, June 23, 2026
Homeदेसाईगंजशासकीय जागेवरील अतिक्रमण भोवला; देसाईगंज तालुक्यातील सावंगीच्या थेट सरपंच अपात्र..

शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवला; देसाईगंज तालुक्यातील सावंगीच्या थेट सरपंच अपात्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शासकीय जागेवर अतिक्रमण करणे एका महिला थेट सरपंचाच्या चांगलेच अंगलट आले आहे.सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी देसाईगंज तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रभा मनोज ढोरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.याबाबत नुकतेच गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेश जारी केले आहे.आदेशात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा अधिनियम क्र.३ चे कलम १४(१)(ज-३)चा भंग केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत सावंगीचे सदस्य म्हणुन अनर्ह ठरविण्यात येत आहे.तसेच ग्रामपंचायत सावंगी मधील सरपंच पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील
मौजा-सावंगी येथील ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणूक माहे ऑक्टोंबर-२०२२ ला पार पडली.सदर निवडणूकीमध्ये प्रभा मनोज ढोरे ह्या सरपंच पदावर
थेट जनतेमधून निवडून आल्या.परंतु,त्यांचे राहते घर सर्व्हे नंबर ३३४ हे वनविभागाच्या जागेवर आहे.सदर घराच्या जागेचा अद्यापही निवासाकरीता पट्टा मिळालेला नाही. वन विभागाचे जागेवर त्यांचे सासरे रुषी मंगरु ढोरे यांनी अतिक्रमण केलेले आहे आणि त्याच जागेवर सरपंच आपल्या परीवारासोबत वास्तव्यास आहेत.अश्यातच काही महिन्यांपूर्वी घराला लागून पुन्हा नविन बांधकाम केले हे नविन बांधकाम सुध्दा वनविभागाच्या सर्व्हे नंबर ३३४ मध्ये आहे आणि सदर बांधकामाची कोणतीही पूर्व परवानगी तहसिल कार्यालयाकडून किंवा ग्रामपंचायत कडून घेतलेली नाही,अशी तक्रार सावंगी येथील देवचंद पांडूरंग मेश्राम यांनी ११ डिसेंबर,२०२५ रोजी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.त्यानुसार,देसाईगंज तहसिलदार यांचेकडून मौका चौकशी अहवाल मागविण्यात आला.चौकशीत शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले.त्यानंतर,प्रभा ढोरे यांनी गडचिरोली येथील प्रत्यक्ष सुनावणीत कोणतेही स्पष्टीकरण अथवा विवादीत जमिनीचा दावा करणारे किंवा मालकी हक्क दर्शविणारे कोणतेही सबळ पुरावे प्रकरणात सादर केलेले नाही किंवा लेखी उत्तर सादर करण्यास संधी देऊनही दाखल केले नाही.प्रकरणी प्रभा मनोज ढोरे,सरपंच,ग्रामपंचायत सावंगी यांचे सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!