Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजआदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. -...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले आहेत.विशेष म्हणजे,मागील हंगामातील खरेदी केलेल्या धानाचा साठा महामंडळाने तब्बल सहा महिन्यांनंतरही गोदामातून उचललेला नाही.परिणामी, गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली असून नवीन धान साठवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
​शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून रब्बीचे धान पदरात पाडून घेतले.आता धान काढून जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला असतांनाही खरेदी प्रक्रिया ठप्प आहे.त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले धान घराच्या अंगणात,खळ्यात आणि शेतातील मोकळ्या जागेत ताडपत्री टाकून साठवून ठेवावे लागत आहे.
  • मुख्य अडचणी आणि शेतकऱ्यांची फरफट👇
​नियोजनाचा बोजवारा: दरवर्षी रब्बी हंगामात हीच समस्या निर्माण होत असतांनाही महामंडळाची यंत्रणा कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा आगाऊ नियोजन करत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
​आर्थिक कोंडी: धान विक्री रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे भांडवल अडकले असून,आगामी खरीप हंगामाच्या मशागतीसाठी आणि बियाणे खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी,असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
  • ​अवकाळीची टांगती तलवार👇
​सध्या मान्सूनपूर्व व अवकाळी पावसाचे दिवस आहेत. जर अचानक वादळी पाऊस झाला,तर उघड्यावर असलेला लाखो रुपयांचा सुवर्णकण(धान)मातीमोल होण्याची भीती आहे.शेतकऱ्यांच्या कष्टाची सुरक्षा आणि खरेदीची जबाबदारी असलेल्या यंत्रणाच आता उदासीन असल्याचा आरोप होत आहे.
  • ​आंदोलनाचा इशारा👇
​तात्काळ गोदामातील जुना धान्यसाठा मिलर्सकडे पाठवून रब्बी धान खरेदी केंद्रे युद्धपातळीवर सुरू करण्यात यावीत,अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.येत्या काही दिवसांत खरेदी सुरू न झाल्यास आणि पावसामुळे धानाचे नुकसान झाल्यास मोठे जनआंदोलन पुकारण्यात येईल,असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!