भंडारा :-स्वतःच्या शेतीला पाणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्यास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल,शुक्रवारी २४ जानेवारीला सकाळच्या सुमारास भंडारा तालुक्याच्या माटोरा गावात उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.राजू ताराचंद सेलोकर रा.माटोरा,वय ३७ वर्षे ता.जि.भंडारा असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,राजू सेलोकर हे शेतीला पाणी करण्यासाठी शेतावर गेले असता,बराच वेळ होऊनही घरी परतले नाही.त्यामुळे त्यांचे भाऊ विजय ताराचंद सेलोकर हे शेतावर गेले.शेतावर जाऊन मृतक राजू यांना आवाज देऊनही त्यांनी कसलाही प्रतिसाद न दिल्याने आजूबाजूला शोध घेतला.त्यावेळी शेताला लागून असलेल्या कालव्यावर वन्यप्राण्याने मृताचे शरीर जंगलाकडे ओढत नेल्याचे ओरखडे व रक्त दिसून आले.त्यामुळे सदर घटनेची माहिती गावकरी तसेच वन विभागास देण्यात आली.त्यानुसार गावकरी तसेच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल होत एकच जमाव केला.वनविभागाद्वारे क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करून वाघाच्या हालचालीवर संनियंत्रण ठेवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.कुणालाही वाघाची चाहूल लागताच तातडीने वनविभागाशी संपर्क साधावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतीला पाणी वळविण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; शेतकरी ठार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

