Saturday, August 8, 2026
Homeभंडारा१५ हजाराच्या लाच प्रकरणी चक्क सरपंचासह ग्रामसेवक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

१५ हजाराच्या लाच प्रकरणी चक्क सरपंचासह ग्रामसेवक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाडी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचासह ग्रामसेवक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक घटना काल,शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे,सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून १५ हजार रुपयांची लाच ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली होती.सरपंच लता संदीप गोस्वामी वय ३६ वर्षे व ग्रामसेवक मिलिंद रुपदास जनबंधू वय ५४ वर्षे असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,तक्रारदारास पलाडी येथील जागेवर घर बांधकाम करावयाचे होते.त्यानुसार तक्रारदाराने ग्रामपंचायत पलाडी येथे २०२४ च्या
नोव्हेंबर महिन्यात अर्ज केला होता.त्यानंतर २१ डिसेंबर रोजी तक्रारदाराने सरपंच व ग्रामसेवकाला भेटून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चर्चा केली.चर्चा करीत असतांना हळूचकन दोघांनीही प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपये लागतील,असे वक्तव्य केले.त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग(अँटी करप्शन ब्युरो) भंडारा येथे तक्रार केली.यावरून २० जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता,लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार एसीबीच्या पथकाने काल,शुक्रवारी २४ जानेवारीला दुपारच्या सुमारास सापळा रचला.दरम्यान,सरपंच गोस्वामी यांना रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले.त्यानुसार सरपंचासह ग्रामसेवकास अटक करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!