- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण
मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.तर बऱ्याच नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत हातात संविधान स्वीकारले. अनेकांनी मरण्यापेक्षा आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यातच,उरल्या-सुरल्या नक्षलवाद्यांनीही माघार घेतल्याने गेली अनेक दशके नक्षलवादाच्या दहशतीखाली जगणारे गावकरी आता स्वातंत्र्याचा पहिलाच राष्ट्रीय उत्सव साजरा करणार आहेत.विशेष म्हणजे,पूर्वी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला नक्षलवादी काळे आणि लाल झेंडे फडकवून बहिष्कार टाकायचे.मात्र,आता छत्तीसगडच्या बस्तर भागातील तब्बल ९२ गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच येत्या, शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा ध्वज फडकावला जाणार आहे.महत्वाचे म्हणजे, नक्षलविरोधी अभियानात बलिदान दिलेल्या शूर जवानांच्या स्मरणार्थ,बस्तरमधील ५०० हून अधिक शाळा,प्रमुख चौक आणि सार्वजनिक इमारतींना त्यांची नावे दिली जातील,३१ मार्च रोजी या भागात सशस्त्र नक्षलवाद्यांचा बीमोड केल्यानंतर येणारा हा पहिलाच राष्ट्रीय उत्सव आहे.या ९२ गावांमध्ये बीजापूर जिल्ह्यातील ३३,सुकमा जिल्ह्यातील ५० आणि नारायणपूर जिल्ह्यातील ९ गावांचा समावेश असल्याचे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी म्हटले.पूर्वी नक्षली हिंसाचारामुळे ‘कुख्यात’ झालेले हे भाग आता विकास आणि राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून ‘विख्यात’ केले जात आहेत.बस्तरच्या प्रत्येक गावात आता तिरंगा यात्रा काढली जाईल,असेही शर्मा म्हणाले.
- Advertisement -

