Sunday, August 9, 2026
Homeनागपूरऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.
डॉ.राघवेंद्र रवी वय ६७ वर्षे,रा.बाजीप्रभूनगर,नागपूर असे फसवणूक झालेल्या डॉकटरचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे, सायबर भामट्याने डॉक्टरला प्रथम मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याचा संदेश पाठवला.त्यानंतर, ‘एपीके’ फाईल पाठवून ती फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले.फाईल डाऊनलोड करताच संपूर्ण मोबाईलचा ताबा हा सायबर गुन्हेगारांकडे गेला.त्यानंतर,काही क्षणातच डॉक्टरच्या बँक खात्यातून लागोपाठ साडेसात लाख रुपये काढल्याचा मॅसेज आला.मॅसेज येताच आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.प्रकरणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. प्रकरणाचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस प्रशानाकडून सुरू करण्यात आला आहे.
  • नागरिकांना आवाहन👇
अज्ञात व्यक्तींनी मोबाईलवर पाठविलेल्या कोणत्याही फाईल डाऊनलोड करू नका.कुठलीही बँक केवायसीसाठी ग्राहकांना संपर्क करीत नसून स्वतः बँकेत जाऊन केवायसीची प्रक्रिया पार पाडावी.त्याचबरोबर, ऑनलाईन ‘ई-चालन’च्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अश्या कुठल्याही मॅसेजवर विश्वास ठेवू नये व त्यावर क्लिक करू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!