Saturday, August 8, 2026
Homeभंडाराशेतीला पाणी वळविण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; शेतकरी ठार..

शेतीला पाणी वळविण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; शेतकरी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-स्वतःच्या शेतीला पाणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्यास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल,शुक्रवारी २४ जानेवारीला सकाळच्या सुमारास भंडारा तालुक्याच्या माटोरा गावात उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.राजू ताराचंद सेलोकर रा.माटोरा,वय ३७ वर्षे ता.जि.भंडारा असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,राजू सेलोकर हे शेतीला पाणी करण्यासाठी शेतावर गेले असता,बराच वेळ होऊनही घरी परतले नाही.त्यामुळे त्यांचे भाऊ विजय ताराचंद सेलोकर हे शेतावर गेले.शेतावर जाऊन मृतक राजू यांना आवाज देऊनही त्यांनी कसलाही प्रतिसाद न दिल्याने आजूबाजूला शोध घेतला.त्यावेळी शेताला लागून असलेल्या कालव्यावर वन्यप्राण्याने मृताचे शरीर जंगलाकडे ओढत नेल्याचे ओरखडे व रक्त दिसून आले.त्यामुळे सदर घटनेची माहिती गावकरी तसेच वन विभागास देण्यात आली.त्यानुसार गावकरी तसेच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल होत एकच जमाव केला.वनविभागाद्वारे क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करून वाघाच्या हालचालीवर संनियंत्रण ठेवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.कुणालाही वाघाची चाहूल लागताच तातडीने वनविभागाशी संपर्क साधावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!