Tuesday, June 30, 2026
Homeभंडाराप्रेयसीला भेटायला जाणे युवकास पडले महागात.. - तरुणीकडील मंडळींनी धो-धो धुतले..

प्रेयसीला भेटायला जाणे युवकास पडले महागात.. – तरुणीकडील मंडळींनी धो-धो धुतले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हल्ली सगळीकडेच आंब्याच्या झाडाला जसे बार फुलून येते,त्याप्रमाणे प्रेम-प्रकरणे बहरून येऊ लागले आहेत.त्यामुळे भेटी-गाठी होणे साहजिकच आहे.अशातच नुकतेच दोन दिवसांपूर्वी प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणास तरुणीकडील मंडळींच्या लक्षात येताच मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिस स्टेशन हद्दीत घडली.
माहितीनुसार,मोहाडी तालुक्याच्या वडेगाव येथील एका तरुणीला भेटण्यासाठी जवळीलच हरदोली येथील प्रियकर मंगळवारी सायंकाळी गावात पोहोचला. मात्र,तरुणीकडील परिवारास या प्रकाराची कुणकुण लागताच,तिचे भाऊ,वडील व काही नातेवाइकांनी या तरुणाला चांगलाच धो-धो धुतला.मार खाऊनही बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार झाली नसल्याची माहिती आहे.त्यातच प्रियकराला धो-धो धूने  सुरू असतांना कुणीही मध्यस्थी करण्यासाठी अथवा वाचविण्यासाठी मध्ये पडले नाही.यामुळे त्याची सर्वांनी चांगलीच धुलाई केली.त्यानंतर,प्रियकराने आपल्या गावातील काही मित्रमंडळींना हा प्रकार कळविला. त्यानंतर हरदोली येथील काही मित्रमंडळींनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली व त्याला घेऊन ते निघून गेले.भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन त्याला घरी नेण्यात आले व प्रकरणावर चुप्पी साधण्यात आली असली तरीही गावात चर्चेला उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ आढळला मृतावस्थेत; परिसरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील चितेगाव बिट आणि राजोली राऊंड अंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील चिखली चक क्र.२ येथील बिगर वनक्षेत्रात सर्व्हे क्रमांक ७८...

पहिल्यांदा लाचेची मागणी; संशय येताच हात झटकले.. – मेयो हॉस्पिटलच्या वैद्यकिय मंडळाचे अध्यक्ष तथा प्राध्यापक शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व लघुलेखक एसीबीच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तीन महिने वैद्यकीय रजेवर असल्याने तीन महिन्यानंतर कार्यालयात रुजु होण्यासाठी वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची...

सर्प दंशाने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपुर :-एका सहा वर्षीय चिमुकल्याचा सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.समीर मारोती आत्राम वय...

गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.. – ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!