- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील मेंढा वैनगंगा नदी रेती घाटातील कोट्यवधी रुपयांचे अवैध वाळू उपसा प्रकरण ताजे असतांनाच आता कोंढाळाच्या सिंद्राई रेती घाटावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू झाल्याचे काल,बुधवारी २३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष रेती घाटातील पाहणीवरून दिसून आले.वाळू उपसा होत असतांना कुठून कुठपर्यंत वाळूचे उत्खनन होणार आहे; याबाबत सिमांकन झेंड्या नसल्याने कंत्राटदाराच्या दिवाणजीने तसेच गावातील तलाठीने एकच एक्झॅक्ट उत्तर दिल्याने उंचावणाऱ्या भुवया एकदम खाली गेल्या. दोघांनीही सिमांकन करण्यात आलेल्या झेंड्या मच्छीमारांनी उपटून नेल्या असल्याचे सांगितले. मात्र,रेती घाटाचा ताबा देत असतांनाच सर्वप्रथम कुठून-कुठपर्यंत रेतीचा उपसा करण्यात यावा,यासाठी रेती घाटावर झेंड्या नाही तर पोल गाळाने आवश्यक आहे व सदर रेती घाटाचा ताबा हा त्या महसूल विभागाच्या सर्कल मधील मंडळ अधिकारी देत असतो.मात्र,कोंढाळा येथील सिंद्राई रेती घाटात ना झेंड्या दिसतात,ना पोल दिसून येतात.अशातच देसाईगंज महसूल विभागाच्या कोंढाळा सर्कलमध्ये किशोर पी.ठाकरे हे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यातच ‘दिवालीला म्हणजेच भिंतीलाही कान असतातच’ या म्हणीप्रमाणे गल्लीबोळात सुरू असणाऱ्या चर्चेनुसार कंत्राटदार व मंडळ अधिकारीही आरमोरी सर्कलचेच असल्याने मंडळ अधिकाऱ्यांना रेती घाटावरील पोल बाबत विसर पडला की काय? नाहीतर कुणी तरी गाळलेले पोलही उपटून नेलेत,अशी म्हणण्याची वेळ येऊ नये.रेती उपसा करण्याची खोली १ मीटर असतांना वाळूचा उपसा भुईसपाट होऊनही मंडळ अधिकारी एवढे निद्रावस्थेत कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पाणी कुठेतरी मुरले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही व एक दिवस कोंढाळा गावातील वाळू घाटांचे ‘जय हिंद जय भारत’ झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे याबाबत गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दाखल येणार आहे.हे विशेष.
(पुढील वृत्त -पर्यावरणाची परवानगी असूनही पर्यावरणाचा ऱ्हास)

- Advertisement -

