Saturday, June 20, 2026
Homeभंडारापैश्याची हाव सुटली अन् झाली गडबड... - बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह १० जणांना...

पैश्याची हाव सुटली अन् झाली गडबड… – बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह १० जणांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :- ‘लालच बुरी बला है..!’ असे नेहमी नाहीतर एखादेवेळी तरी आपण ऐकत असतो.एकदा का पैश्याची हाव सुटली तर त्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांची दुनियेत कमी नाही.अश्याच प्रकारची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील ॲक्सिस बँकेच्या बाबतीत काल,मंगळवारी उघडकीस आली.ॲक्सिस बँकेच्या शाखेतून ५ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला.या प्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या चौकशीत बँक मॅनेजर गौरीशंकर बावनकुळेने घटनेबाबत अनेक खळबळजनक खुलासे केल्याची माहिती आहे.त्यात त्याने बँकेच्या लॉकरमधून स्वतः ५ कोटी रुपयांची रोकड बाहेर काढून ती बॅगमध्ये भरून संशयित काटकरच्या राजकमल लाँड्रीत नेल्याची कबुली दिली.ताब्यात घेतलेली रोकड मोठी असल्याने पोलिसांना रक्कम मोजण्याकरिता तब्बल ३ तास लागले.त्याकरिता स्थानिक बँकांमधून रोकड मोजणाऱ्या मशिनी मागविण्यात आल्या होत्या.घटना उघडकीस येताच मुख्य चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जप्तीतील रकमेचा आकडा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.शहरात वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले.त्यातच आता घटनेबाबत आज,बुधवारी आणखी धक्कादायक
माहिती समोर आली आहे.पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडून शाखा व्यवस्थापकाने बँकेतून ५ कोटी रुपये काढले व रक्कम चार मोठ्या सुटकेसमध्ये भरून दोन वाहनांमधून तुमसरमधील राजकमल ड्रायक्लिनर्समध्ये नेण्यात आली होती.छत्तीसगड आणि गोंदिया येथील टोळीने ५ कोटींच्या बदल्यात ७ कोटी देण्याचे आमिष दाखवून शाखा व्यवस्थापकाला जाळ्यात ओढल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ॲक्सिक बँकेचा व्यवस्थापक गौरीशंकर बावनकुळे वय ४० वर्षे, मिलिंद रामटेके वय ३० वर्षे,विशाल ठाकरे वय २९ वर्षे,जगदीश काटकर वय ४८ वर्षे,विनीत कक्कड वय ३८ वर्षे,शुभम नागदेवे वय ३३ वर्षे,सागर मुलतानी वय ३२ वर्षे,राजा खोब्रागडे वय ३२ वर्षे,शुभम रंगारी वय ३३ वर्षे आणि चंद्रशेखर धाबु वय ५४ वर्षे यांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!