Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीअन्यथा संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजनेचे अनुदान होणार बंद.. - लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे...

अन्यथा संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजनेचे अनुदान होणार बंद.. – लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ पासून अनुदानाची रक्कम थेट ‍डिबीटी (Direct Benefit Transfer) म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.तथापि,ज्या लाभार्थ्यांनी अद्याप त्यांचे आधार कार्ड,मोबाईल क्रमांक,बँक खाते,पासबुक तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालयात कागदपत्रे सादर केली नाहीत,अशा लाभार्थ्यांचे अनुदान फेब्रुवारी २०२५ अखेरपासून बंद होणार आहे.तरी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी पुढील सात दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर करावीत.डिबीटी पोर्टलकरिता शिल्लक लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना अडचण आल्यास संबंधित कोतवाल व ग्राम महसूल अधिकाऱ्यांची मदत घ्यावी; असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!