Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे उद्धाटन थाटात संपन्न

गडचिरोलीत राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे उद्धाटन थाटात संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडापरिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन (१९ वर्षाखालील मुले व मुली) तसेच टेनिक्वाईट (१४/१७/१९ वर्षाखालील मुले व मुली) या स्पर्धांचे आयोजन शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड,गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आले असून सदर स्पर्धेचा उद्धाटन सोहळा ४ फेबुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीच्या प्रांगणात संपन्न झाला.
उद्धाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन शिवछत्रपती पुरस्कारार्थी राजेंद्र भांडारकर हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून डॉ.प्रशांत जाखी प्राचार्य शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली उपस्थित होते. मंच्यावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रुपाली पापडकर, कार्यकारी सदस्य,भारतीय बॉल बॅडमिंटन महासंघ  परेश देखमुख,शरद वाभळे,राजेश्वर बंगर,ॲड.मृणाल बांडेबुचे,ऋषीकांत पापडकर,अशोक ठोकळ इत्यादी क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र राज्यातील आठही विभागातील खेळाडू स्पर्धा आयोजनामध्ये सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन सुरुवात करण्यात आली असून प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहन करुन मार्च-पास करुन प्रमुख अतिथींनी मानवंदना स्विकारली.उद्धाटक  राजेंद्र भांडारकर यांनी आपल्या भाषणातून खेळाडूंना मार्गदर्शन करुन आयोजीत खेळाचे महत्व पटवून दिले व भविष्यात खेळामध्ये सहभागी झाल्याने त्याचा लाभ कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.प्रशांत जाखी प्राचार्य शा.वि.महा. गडचिरोली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषानातून खेळाडूंनी जास्तीत जास्त शारीरिक मेहनत करुन आपल्या क्रीडा प्रकारात हेरगीरीने कला कौशल्य दाखवून उत्तम कामगीरी करण्याबाबत शुभेच्छा देऊन आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा नाव लौकिक करावे, असे सांगीतले.जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून राज्यस्तरीय स्पर्धेकरीता खेळाडूंसाठी केलेल्या सुविधांची माहिती देऊन स्पर्धेची सर्वसाधारण रुपरेषा सांगीतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस.बी.बडकेलवार यांनी केले.स्पर्धेकरीता क्रीडा अधिकारी कार्यालयातील घनश्याम वरारकर,नाजुक उईके,विशाल लोणारे, चंद्रशेखर मेश्राम,कार्यालयातील सर्व मानद कर्मचारी व जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेतील सर्व पदाधिकारी व आशिष निजाम यांच्या मार्गदर्शनात सर्व स्थानिक खेळाडू व राज्य संघटनेकडून तांत्रिक अधिकारी व पंच यांचे मार्गदर्शनात स्पर्धा आयोजनास सुरुवात करण्यात आली असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!