Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरकृषी सहाय्यकाला १ हजार रुपये घेणे पडले महागात.. - लाच लुचपत प्रतिबंधक...

कृषी सहाय्यकाला १ हजार रुपये घेणे पडले महागात.. – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका ३६ वर्षीय कृषी
सहाय्यकाला १ हजाराची लाच घेतांना काल, मंगळवारी ४ फेब्रुवारीला रंगेहाथ पकडुन अटक करण्यात आली आहे.सरजीव बोरकर वय ३६ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे.
माहितीनुसार,तक्रारदार शेतकरी मौजा माजरी-कॉलरी ता.भद्रावती,जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांची नंदोरी येथे शेती आहे.शेतीस फवारणी करीता  महाडिबीटी योजनेअंतर्गत बॅटरी स्प्रे पंपासाठी त्यांनी
 सप्टेंबर २०२४ मध्ये अर्ज केला होता.त्यानुसार बॅटरी स्प्रे पंप सप्टेंबर २०२४ मध्येच मंजूर करण्यात आला व ७ ऑक्टोंबर २०२४ रोजी कृषी विभागामार्फत इतर शेतकऱ्यांना स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले होते. परंतु तक्रारदार बाहेरगावी असल्याने स्प्रे पंप मिळू शकले नाही.त्यामुळे तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे जावून कृषी सहाय्यक सरजीव अजाबराव बोरकर यांची भेट घेतली असता कृषी स्प्रे पंप देण्यासाठी टाळाटाळ केली मात्र,सोमवारी ३ फेब्रुवारीला त्यांनी तक्रारदार यांना फोन करून बॅटरी स्प्रे पंप देण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.याबाबत तक्रारदार शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्यानुसार काल मंगळवारी सापळा रचून कृषी सहाय्यकास अटक करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!