Friday, September 4, 2026
Homeनागपूरएकीकडून निसटले अन् दुसरीकडे अडकले..! - रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या..

एकीकडून निसटले अन् दुसरीकडे अडकले..! – रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अवैध वाळू उपसा करून महसूल विभागास चकमा देणाऱ्या तीन टिप्परवर मोठ्या शिताफीने कारवाई करण्यात आल्याची घटना काल,मंगळवारी  सकाळच्या सुमारास उमरेड-शिवापूर मार्गावर घडली. वाळू उपसा करणाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील गुडेगाव घाट परिसरातून अवैध रेतीचे उत्खनन केल्यानंतर भिवापूरच्या महसूल चमूला चकविले. त्यामुळे भिवापूरच्या टीमने शक्कल लढवत उमरेड महसूल विभागाला कळविले.त्यानुसार सापडा रचत रेतीचे तीन टिप्पर उमरेड महसूल पथकाच्या  जाळ्यात अडकल्याने ‘एकीकडून निसटले अन् दुसरीकडे अडकले’ असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या तीन टिप्पर चालक- मालकांवर उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाईची मोहीम राबविण्यात आली.तीन टिप्पर मिळून एकूण १८ ब्रास रेती आणि तीन टिप्पर जप्त करण्यात आले असून, अंदाजे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.काल मंगळवारी अगदी पहाटेपासूनच उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या आदेशान्वये उमरेड व भिवापूर येथील महसूल विभागाची चमू रेती तस्करांवर गस्त घालत होती. तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या.तिकडे भिवापूरच्या टीमने रेती टिप्परचा पाठलाग केला.तर दुसरीकडे ज्या मार्गाने टिप्पर पळविले जात होते,त्याच मार्गावर उमरेड-शिवापूर शिवारात उमरेड येथील महसूल विभाग आणि पोलिस विभाग अलर्ट झाले होते.संपूर्ण टीम या मार्गावर टिप्परची प्रतीक्षा करीत होते.अशातच तिन्ही टिप्पर मार्गालगत येताच तपासणीअंती कारवाई करण्यात आली.या कारवाईत एमएच ४९ बीझेड २२२२ या टिप्परमधून ६ ब्रास अवैध रेती आढळली.अजीज मस्तान खान (खरबी,नागपूर) असे टिप्पर मालकाचे नाव असून,प्रणय दुधनकर (बाम्हणी) असे चालकाचे नाव आहे.एमएच ४० सीटी ७८६३ तसेच एमएच ४० बीएल ७८६३ या दोन वेगवेगळ्या टिप्परमधूनही प्रत्येकी ६ ब्रास अवैध रेती आढळून आली.अनिकेत भरतपायले (तिरखुरा) आणि धनराज कुथे (पवनी) अशी अनुक्रमे टिप्पर चालकांची नावे आहेत.या दोन्ही टिप्परच्या मालकाचे नाव रूपेश धोटे (नागपूर)आहे. तिन्ही टिप्पर मिळून एकूण १८ ब्रास रेती विनारॉयल्टीची आढळून आली.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये ७ लाख ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण,तहसीलदार मनोहर चव्हाण,कल्याणकुमार डहाट यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार संजय राठोड,तलाठी रवींद्र शेरकी,त्र्यंबक वेलादी,हेमंत ठाकूर आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!