उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- लाखनी तालुक्यातील राजेगाव/मोरगाव येथे ४० वर्षीय युवकाने नैराश्यातून घराच्या मागील भागात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.राजेश प्रल्हाद रहांगडाले (४०, रा. राजेगाव/मोरगाव) असे मृताचे नाव आहे.राजेश हा मजुरीचे काम करीत होता.त्याचे डी.एड.झाले असून, नोकरीच्या शोधात होता.त्याला नोकरी न लागल्याने व लग्न न झाल्याने नैराश्यातून दारूच्या आहारी गेला होता. त्याने सांदवाडीत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली.बुधवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

