Monday, October 26, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…-पिकांची होणारी नासाडी रोखण्याकरीता जायचा जागलीला…

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…-पिकांची होणारी नासाडी रोखण्याकरीता जायचा जागलीला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील खानगाव शेतशिवारात स्वतःच्या शेतात पिकांची राखण करण्याकरीता गेलेल्या एका युवक शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना आज दिनांक -१५ मे रोजी सकाळी उघडकीस आली.सदर घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.अंकुश श्रावण खोब्रागडे वय ३३ वर्षे,रा. खानगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

चिमूर तालुक्यातील खानगाव निवासी युवक अंकुश श्रावण खोब्रागडे स्वतःच्या शेतामध्ये दररोज जनावरांपासून पिकांची होणारी नासाडी रोखण्याकरीता जागलीला जात होता.काल मध्यरात्री अंकूशला शौचास लागल्यामुळे तो शेतालगत नदीपाटाजवळ गेला होता.याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. यामध्ये तो जागीच ठार झाला.

आज बराचवेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ हेमराज हा शेतात त्याला पहायला गेला.शेतात चप्पल व मोबाईल आढळून दिसले.अथंरूणावर तो आढळून आला नाही.त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली.काही अंतरावरील नदीपाटात मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती गावात पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.नागरिकांमध्ये प्रचंड वनविभागाविरोधात आक्रोश निर्माण झाला. नागरिकांचा संताप वाढत असताना परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असतानाच वनविभागाने शेगाव पोलीसांना पाचारण केले.ठाणेदार योगेंदरसिंग यादव यांचे पथक दाखल झाले.

जो पर्यंत मृतकाच्या कुटूंबियांना मोबदला मिळणार नाही,तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही; अशी भूमिका घेऊन गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले.वनविभागाचे एस एफ हजारे यांना घटनेची माहिती दिली.काही वेळात ते घटनास्थळी दाखल झाले.गावकऱ्या सर्व मागण्यांचे स्टॅम्पपेपरवर लेखी हमी पत्र दिल्यानंतर मृतदेह उचलू देण्यात आला.चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविचछेदनाकरीता मृतदेह पाठविण्यात आला.यावेळी मृतकाच्या कुटूंबियाना नगदी एक लाखाची नगदी तर ४ लाखांचा चेक देण्यात आला. शवविच्छेदनानंतर उर्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन वनविभागाने दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!