उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- जिल्हा आदिवासी,बहूल,दुर्गम व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यात राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत धान खरेदी पुर्ण होऊ न शकल्याने; हजारो शेतकरी आधारभूत धान विक्री योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.हजारो शेतकरी बांधव धान विक्रीपासून वंचित राहण्याचा धोका होता ही बाब लक्षात घेता प्रारंभी राज्य शासनाने १५ फेब्रुवारीपर्यंत धान खरेदीस मुदतवाढ दिली होती.मात्र त्यानंतरही हजारो शेतकरी वंचित असल्याने आता धान्य खरेदीकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.