- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडारा जिल्ह्याला जणूकाही ग्रहण लागले की काय? असे हल्ली निदर्शनास येऊ लागले आहे.जिल्ह्यात दररोज कुठली ना कुठली तरी अनुचित घटना घडत आहे.कधी अपघात,तर कधी आत्महत्या,तर कधी अपहरण व नाना तऱ्हेचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.अशातच आता काल सोमवारी १७ मार्चच्या सकाळी भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ढीवर मोहल्ल्यात एका ३८ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.३८ वर्षीय महिलेने घरातील पंख्याला नायलॉन दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.हर्षा खेमराज उईके रा.अड्याळ,ता.पवनी,जि.भंडारा असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,घटनेच्या एक दिवसापूर्वी हर्षा व १३ वर्षीय लहान मुलगा सुशांत हे दोघेही रविवारी रात्रीच्या सुमारास टिव्ही बघत होते.परंतु,काल सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नळाचे पाणी आल्याने तिला शेजारच्या महिलेने आवाज दिला.यावेळी सुशांतने दार उघडले व आई अंथरूणावर नाही पाहून तिला पाहण्यासाठी घरातील आतल्या खोलीत गेला असता तो समोरील दृश्य पाहून जोरजोराने रडायला लागला.शेजारच्यांनी तेथे जात ही माहिती तत्काळ गावातीलच अड्याळ पोलिस ठाण्यात दिली.यानंतर ठाणेदार धनंजय पाटील तसेच पोलिस कर्मचारी, होमगार्ड व पोलिस पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून शवविच्छेनानंतर काल सोमवारीच अड्याळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.घटना घडली तेव्हा घरात तिचा लहान मुलगा व हर्षा हे दोघेच होते.पती व मोठा मुलगा हे बाहेरगावी कामावर गेले होते.महिलेने आत्महत्या कां केली? याचा तपास अड्याळ ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार फुलचंद मेश्राम तसेच पोलिस हवालदार सुभाष रहांगडाले करीत आहेत.
- Advertisement -