Friday, August 7, 2026
Homeगडचिरोलीविद्यार्थ्यांकरिता एमपीएससी पूर्व प्रशिक्षण..

विद्यार्थ्यांकरिता एमपीएससी पूर्व प्रशिक्षण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)पूर्व प्रशिक्षण तसेच जिल्हा निवड समितीच्या विविध पदभरती आणि बँकिंग निवड संस्था(IBPS- Institute of Banking Personnel Selection)स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) परीक्षांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने शालांत परीक्षा (१० वी/१२वी) उत्तीर्ण असणे आवश्यक असून,त्यांच्याकडे रोजगार नोंदणी कार्ड (Employment Card) असणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने असून,प्रशिक्षण कालावधीत दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अर्ज विनामूल्य उपलब्ध असून,उमेदवारांनी १ मार्च  ते २७ मार्च २०२५ या कालावधीत अर्ज भरून सादर करावा.त्यानंतर २८ मार्च रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल,बॅरक क्र.२,गडचिरोली येथे मुलाखत घेण्यात येईल.अधिक माहितीसाठी ८४८५८१४४८८ (8485814488) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!