Friday, August 28, 2026
Homeभंडाराभीषण कार अपघातात तरुणाचा मृत्यू; चार मित्र गंभीर..

भीषण कार अपघातात तरुणाचा मृत्यू; चार मित्र गंभीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेला गावाजळ कारचा भीषण अपघात होऊन अपघातात एका २२ वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर त्याचे चार मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज, मंगळवार १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे वय २२ वर्षे,रा.अड्याळ, ता.पवनी,जि.भंडारा असे अपघात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.तर जखमींमध्ये साजीद मुस्तफा पठाण वय १८ वर्षे,रा.अड्याळ,क्रिश भिवाजी जिभकाटे वय १९ वर्षे,रा. चिचाळ,अभिषेक दीपक बन्सोड वय ३० वर्षे,रा.तिर्री व आयुष भास्कर कावळे वय २४ वर्षे,रा.तिर्री यांचा समावेश आहे.
पाचही तरुण काल,सोमवार १३ एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नागपूरला कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. रात्रभर कार्यक्रम पाहून नागपूरहून गावाकडे परत येत असतांना भंडारा पोलिस स्टेशन हद्दीतील बेला गावाजवळ त्यांची कार अनियंत्रित झाली आणि अनियंत्रीत कार झाडावर आदळून पलटी झाली.यात सोनू डोंगरे हा जागीच मृत पावला.सोनू हा पाच बहिणींमध्ये एकुलता एक होता.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून डोंगरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!