Thursday, July 9, 2026
Homeगडचिरोलीअत्याचार प्रकरणांमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्रांचे वितरण..

अत्याचार प्रकरणांमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्रांचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार प्रकरणांमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या शासन निर्णयाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करत समाज कल्याण विभागाच्या वतीने ९ पीडित कुटुंबीयांना शासकीय नोकरीत नियुक्ती देण्यात आली.या नियुक्त्यांना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी दिली असून आज,मंगळवार १४ एप्रिल रोजी आयोजित समता सप्ताह समारोप सोहळ्यात संबंधित लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
समाज कल्याण विभाग सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी नियुक्त झालेल्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.याच कार्यक्रमात समाज कल्याण विभागांतर्गत वसतिगृह व ग्रंथालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी करून शासन निर्णयाची माहिती व त्यामागील उद्देश स्पष्ट केला.त्यांनी अत्याचारग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी कुलदीप मेश्राम यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!