- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बाल निरीक्षण गृहाच्या एका सेक्युरिटी गार्डची ऑर्डर काढण्यास मदत व दर महिन्याला कंपनीला हजेरीपट पाठवण्यासाठी ३० हजाराची लाच घेतांना कनिष्ठ संरक्षण अधिकारी, अतिरिक्त पदभार,अधिक्षक शासकीय निरीक्षण गृह बीड यांना जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.कपिल भिमराव कांबळे वय ४३ वर्षे,पद-कनिष्ठ संरक्षण अधिकारी,अतिरिक्त पदभार,अधिक्षक शासकीय निरीक्षण गृह बीड,वर्ग ३,रा.पंचशील नगर,बीड असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार यांची स्मार्ट सर्विसेस कंपनी पुणे यांचे मार्फतीने सिक्युरीटी गार्ड म्हणून बाल निरीक्षण गृह बीड येथे नेमणूक झाल्याने सदर ठिकाणी रुजू झालेले आहेत.त्या ठिकाणी अधिक्षक म्हणून कपिल कांबळे हे काम पाहतात.सेक्युरिटी गार्डची हजेरीची हजेरीपटात नोंद घेऊन त्याचा दर महिन्याला स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी पुणे यांना रिपोर्ट पाठविल्यानंतर स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी पुणे यांचेकडून सेक्युरिटी गार्डचे पगार होते.हजेरीची नोंद घेऊन त्याचा दर महिन्याला कंपनीला रिपोर्ट पाठवण्याचे काम अधीक्षक कपिल कांबळे हे करतात.तक्रारदार हे कामावर रुजू झाल्यापासुन हजेरीची नोंद घेऊन त्याचा कंपनीला रिपोर्ट पाठवण्यासाठी व तक्रारदार यांची सेक्युरिटी गार्डची कंपनी कडून ऑर्डर काढण्याच्या कामात मदत केली म्हणून ४५ हजार रुपयेची लाच मागणी केली.परंतू तक्रारदार यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी काल,सोमवार १३ एप्रिल रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार,काल सोमवारी पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता कपिल कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ऑर्डर काढण्यास मदत केली म्हणून व हजेरीपट दर महिन्याला कंपनीला पाठवण्यासाठी तात्काळ ३० हजार रुपये व उरलेले १५ हजार रुपये तक्रारदार यांचा पगार झाल्यावर स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले.त्यावरुन काल,सोमवार १३ एप्रिल रोजी कांबळे यांचे कारमध्ये पालवण चौक बीड येथे पंचासमक्ष सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडुन ३० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना लाचलुचपत प्रतिंधक विभाग जालनाचे पोलीस उपअधीक्षक बी.एस.जाधवर यांनी व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेतले.कांबळे यांची अंगझडती घेतली असता लाचेचे ३० हजार रुपये व इतर १०० रूपये,एक मोबाईल,दोन पिवळ्या धातूच्या अंगठ्या मिळून आल्या आहेत.प्रकरणी कपिल कांबळे विरोधात पोलीस ठाणे शिवाजीनगर,जि.बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नागरिकांना आवाहन👇
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना यांचे कडुन आवाहन करण्यात येते कि,एखादा लोकसेवक स्वतः अगर इतरांमार्फत शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खासगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास फोन नंबर ०२४८२-२२०२५२, टोल फ्री.क्रं.१०६४ व मो.क्रं.९७६४०२१०६४ वर संपर्क करावा.तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं.९८८१४६३३६५ व ईमेल dysp.acbjalna@mahapolice.gov.in व dyspacbjalana@gmail.com वर संपर्क करावा.
- Advertisement -

