Saturday, October 17, 2026
Homeनागपूरसंगीताचे वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने केला चिमुकलीचा विनयभंग; आरोपी शिक्षक फरार..

संगीताचे वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने केला चिमुकलीचा विनयभंग; आरोपी शिक्षक फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-संगीताचे वर्ग घेणाऱ्या एका ४३ वर्षीय
शिक्षकाने ६ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना कामठी शहरात उघडकीस आली असून या प्रकरणी चिमुकलीच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवताच घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे.पोलिस त्याच्या मागावर आहेत. स्वप्निल राजाबाबू बन्सोड वय ४३ वर्षे,रा.छत्रपतीनगर, नवीन कामठी,जि.नागपूर असे आरोपी संगीत शिक्षकाचे नाव असून त्याच्यावर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७५,११५(२),पॉक्सो कलम ८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्निल बन्सोड हा मागील काही वर्षांपासून स्वतःच्या घरीच संगीताचे क्लास घेत होता.तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.पीडित चिमुकली त्याच्याकडे संगीत शिकायला जायची.पाच दिवसांपूर्वी ती क्लासला गेली होती.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास क्लास सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या घरी निघून गेले. अश्यातच चिमुकली घरी जात असतांनाच,त्याने तिला थांबवले व आपण ‘किसी-किसी’ खेळू,अशी बतावणी करून तिला दुसऱ्या खोलीत नेले.तिथे तिच्याशी अश्लील चाळे केले व सदरचा प्रकार कुणाला सांगू नको,अशी दमदाटीही त्याने विद्यार्थिनीला केली.घाबरलेल्या चिमुकलीने सदरचा प्रकार ११ एप्रिलच्या रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आईला सांगितला.घडलेला संपूर्ण प्रकार पीडित चिमुकलीकडून कळताच,याबाबत विचारणा करण्यासाठी तिची आई दुसऱ्या दिवशी १२ एप्रिलला स्वप्निलच्या घरी गेली  आणि तिने विचारणा करताच,स्वप्निलने तिला मारहाण करून हाकलून लावले व स्वप्निल घरून पळून गेला.त्यानंतर,आईने चिमुकलीला सोबत घेऊन कामठी(नवीन)पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाचा शोध सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!