- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नांदेड शहराच्या हारूनबाग परिसरात घडली.घटनेने नांदेड शहरात शोककळा पसरली असून मृतक चिमुकल्यांच्या कुटुंबीयांनी काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश केला.मोहम्मद अली वय १३ वर्षे, सय्यद फूरखान वय १३ वर्षे,मोहम्मद अदनान वय १० वर्षे आणि मोहम्मद रेहान वय ११ वर्षे,अशी मृत मुलांची नावे असून चौघेही नांदेड शहराच्या इस्लामपूरा भागातील आहेत.यातील फूरखान आणि रेहान हे दोघे सख्खे भाऊ होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. जवळच काठावर मुलांचे शालेय गणवेश,जुते आणि चपला आढळून आल्या,तेव्हा या दुर्घटनेची भीषणता समोर आली.घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे,इतवारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व जीवरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले.चौघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.हारुनबाग परिसरात नाल्याचे काम सुरू आहे.तिथे मोठ-मोठे खड्डे पडून पाणी साचले असल्याने उन्हाचा तडाखा किंवा खेळण्याच्या ओघात शाळकरी मुले आंघोळ वा पोहण्याच्या उद्देशाने त्या पाण्यात उतरली असावी.मात्र,खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाणी अतिशय खोल असल्याने चारही मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
- Advertisement -

