Saturday, October 3, 2026
Homeनांदेडमन सुन्न करणारी घटना..! पहिल्यांदा पत्नीची गळा चिरून हत्या व नंतर पतीनेही...

मन सुन्न करणारी घटना..! पहिल्यांदा पत्नीची गळा चिरून हत्या व नंतर पतीनेही घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नांदेड :-जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात मन सुन्न करणारी घटना आज,मंगळवार १२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.पहिल्यांदा पतीने ३५ वर्षीय पत्नीचा गळा चिरून खून केला व नंतर पश्चाताप होताच पतीने गावालगतच्या शिवारात गळफास घेऊन स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा गावात उघडकीस आली.पायल विनोद राठोड वय ३५ वर्षे व विनोद रंगराव राठोड वय ४० वर्षे,रा. धारजणी फुलवाडी तांडा,ता.भोकर,जि.नांदेड असे  मृतक पती-पत्नीचे नाव आहे.
पायल व विनोद हे दोघेही पती-पत्नी आपल्या तीन मुलांना घेऊन हिमायतनगर तालुक्याच्या बोरगडी तांडा नंबर-१ येथे मेव्हण्याच्या(चुलत भाऊ) विवाहासाठी गेले होते.दरम्यान,पायलने लग्न समारंभात डिजेवर नृत्य केला होता.यावरून दोघा पती-पत्नीत वाद झाला.अश्यातच मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीने लग्नात नृत्य केल्याच्या रागातून विनोदने पत्नी पायलचा गळा चिरून हत्या केली.यावेळी तो दारूच्या नशेत धुत असावा,असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला व पहाटे दारूची नशा उतरताच त्याने भीतीपोटी गावालगतच्या शिवारात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असावी.सदरचा प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वैजने, पोलिस निरीक्षक अमोल भगत व पोलीस पथकाने भेट देत घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.पती-पत्नीच्या मृत्यूने एक लहान मुलगा व दोन मुली आई-वडीलाविना पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!