Tuesday, July 14, 2026
Homeभंडारारात्री घरात शिरून महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल..

रात्री घरात शिरून महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली येथे एका ५५ वर्षीय इसमाने वृद्ध महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली.प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून नरेंद्र चुटे वय ५५ वर्षे, रा.विरली, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
पीडित वृद्ध महिला ही रात्रीचे जेवण करून घरात झोपलेली असतांना १ एप्रिलच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास आरोपी नरेंद्र चुटे याने घराच्या मागील दारातून आतमध्ये प्रवेश केला.त्यानंतर,आरोपीने वृद्धेचे तोंड आणि गळा दाबून तिचा विनयभंग केला.पीडितेने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.घटनेनंतर पीडित वृद्धेने लाखांदूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!