Sunday, August 30, 2026
Homeनागपूरमहावितरणचा उप व्यवस्थापक व कनिष्ठ लिपीक अडकला एसीबीच्या जाळ्यात.. -अडीच लाखाची लाच...

महावितरणचा उप व्यवस्थापक व कनिष्ठ लिपीक अडकला एसीबीच्या जाळ्यात.. -अडीच लाखाची लाच घेतांना रंगेहाथ अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महावितरणचा उप व्यवस्थापक व कनिष्ठ लिपीक यांनी तक्रारदार यांचे मेडिकल बिल मंजुर करणेकरीता आणि मिळालेल्या एरियर्सच्या रक्कमेचे मोबदल्यात तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणी करून स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरने यशस्वी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
प्रकरणातील तक्रारदार हे हिंगणा एम.एस.ई.बी.(MSEB)ऑफिस येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.कर्तव्यावर असतांना झालेल्या एका अपघातात त्यांचा उजवा हात कापला गेला होता.त्याचे प्रलंबित मेडिकल बिल मंजूर करणे तसेच त्यांना मिळालेल्या एरियर्सच्या रक्कमेच्या मोबदल्यात आरोपी गणेश नथुजी डोरले,वय ५१ वर्षे,उप व्यवस्थापक,मानव संसाधन विभाग,MSEDCLसातगाव बुटीबोरी व सुमित रेवतकर, कनिष्ठ लिपिक,मानव संसाधन विभाग, MSEDCL सातगाव बुटीबोरी यांनी अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे दिली.दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे सापळा पडताळणी करण्यात आली असता,दोन्ही आरोपी लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार,काल गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी आरोपी गणेश डोरले उप व्यवस्थापक यांनी लाचेची रक्कम घेण्यासाठी तक्रारदाराच्या घरी जाण्याचे ठरविल्याने सापळा कारवाई दरम्यान तक्रारदाराच्या राहत्या घरी हॉलमध्ये पंचासमक्ष आरोपीने अडीच लाख रुपयांची लाच स्विकारली. प्रकरणी आरोपी गणेश डोरले याला ताब्यात घेण्यात आले.तसेच आरोपी सुमित रेवतकर,कनिष्ठ लिपिक याने पडताळणी दरम्यान लाचेची मागणी केली असल्याने त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन एमआयडीसी,नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर सापळा कारवाई ही पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया,पोहवा भरत ठाकुर,पोहवा अनिल बहिरे,पोहवा उपेंद्र आकोटकर,मपोहवा कांचन गुलबासे,पोशि.विकेश राउत आणि चापोशि प्रिया नेवारे सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर यांनी केलेली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की,कोणत्याही शासकीय कामासाठी कोणाही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यांच्या विरुद्ध निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा
१. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरध्वणी क्र. 0712-2561520,
२. टोल फ्री क्रमांक: 1064 / व्हॉटसॲप क्र. 9067671064
३.डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र. 9923185566
४.श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो.क्र.7038436441
५.विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो.क्र. 9923142569
६.राजीव कर्मलवार,पोलीस निरीक्षक,वाचक लाप्रवि नागपूर मो.क्र.9021452760
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!