- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी राहिली. हाय व्होल्टेज असलेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी पिछाडीचा खेळ रंगत गेला.पहिल्या फेरीत आघाडीवर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही फेऱ्यानंतर
पिछाडीवर गेले.भाजपचे अविनाश ब्राम्हणकर हे कधी आघाडी तर कधी पिछाडीवर होते.२८ फेऱ्यांपैकी १४ व्या फेरीअखेर काँग्रेसचे नाना पटोले हे अवघ्या ४६९ मतांनी आघाडीवर होते.तर १६ व्या फेरीअखेर भाजपचे अविनाश ब्राम्हणकर ११३ मतांनी आघाडीवर होते.१६ व्या फेरीनंतर मात्र ब्राम्हणकर यांनी आघाडी घेतली.१६ व्या फेरीनंतर ब्राम्हणकर १२३ मतांच्या आघाडीवर होते. २२ व्या फेरीनंतर ब्राम्हणकर २९५५ मतांनी आघाडीवर होते.२४ व्या फेरीत ब्राम्हणकर २२०० मतांनी आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा कायम होती.अखेरीस २८ व्या शेवटच्या फेरीत नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी विजयी झाले.भाजपचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांना कमकुवत उमेदवार म्हणून संबोधले जात होते. परंतु,याच कमकुवत उमेदवाराने नाना पटोलेंना तगडी लढत देत घाम फोडला होता.
- Advertisement -