Tuesday, April 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'संपले इलेक्शन,आता जपा रिलेशन'... राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो; तर...

‘संपले इलेक्शन,आता जपा रिलेशन’… राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो; तर कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर कार्यकर्ते,पदाधिकारी अती उताविळपणा दाखवून अनेक ठिकाणी गावागावात राजकारणामुळे भावकी,नातेवाईक व मित्रमंडळी दुरावली गेली होती. परंतु,निवडणुकीचे मतदान पार पडत असतांना आता ‘संपले गावचे इलेक्शन,आता जपा रिलेशन’ यांसह आदी पोस्ट काही ठिकाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालतांना दिसून आलेत.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो तर कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो.परंतु, अलीकडील काळात होणारे सर्वच राजकारण काही वळणावर गेलेले आहे.निवडणुका दोन दिवसांच्या असतांना मात्र नात्यांमध्ये व मैत्रीमध्ये कायमचा दुरावा निर्माण होत असतो.वेगवेगळ्या पक्षांचे नेते निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका संपल्यावर सर्व काही विसरून सर्व नेतेमंडळी एकत्र येत असतात.परंतु,नेत्यांचे चेले- चपाटे व कार्यकर्ते हे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेपासून एकमेकांना मोठा विरोध दाखवून गावांमध्ये मोठे वेगवेगळे गट निर्माण करत असतात.मात्र,मतदान संपताच ‘संपले गावचे इलेक्शन आता जपा रिलेशन’ असे सांगण्याची वेळ येऊ नये; याकरीता ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे मानून रिलेशन जपणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोरचीतून निघाले अन् चंद्रपुरात सापडले; तब्बल २४ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-तब्बल २१ गोवंशांची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्या तिघांपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठे यश आले आहे.या कारवाईत...

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!