Wednesday, June 10, 2026
Homeभंडाराआज भंडारा जिल्ह्यास रेड अलर्ट; गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे खुले.. - सर्व...

आज भंडारा जिल्ह्यास रेड अलर्ट; गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे खुले.. – सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-काही दिवस सुट्टीवर गेलेल्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.हजेरी तर लावत आहे; मात्र,पाऊस पूर येईपर्यंत सुट्टी करत नसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित होऊ लागले आहे.अश्यातच आज,शुक्रवार २५ जुलै रोजी हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्यास “रेड अलर्ट” म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून,गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे उघडण्यात आले आहेत.गोसेखुर्दमधून २३९०.६८ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे.भंडारा जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आज शुक्रवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

  • अन्य धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू👇
संजय सरोवर १ दरवाजा खुला १७१.४९ क्युमेक्स विसर्ग,धापेवाडा धरण ७ दरवाजे खुले ११६०.११ क्युमेक्स विसर्ग,पुजारीटोला धरण ८ दरवाजे खुले ३५४.०६ क्युमेक्स विसर्ग सुरू असून कारधा नदीची पातळी २४२.०५ मीटर असून,सध्या ईशारा पातळी २४५ मीटर पेक्षा खाली आहे.त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी नदी-नाल्यांजवळ जाऊ नये,पूरप्रवण भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!