Tuesday, May 26, 2026
Homeचंद्रपूरसिने अभिनेत्री रविना टंडन जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी बल्लारपूर-कारवा पर्यटन क्षेत्रात..

सिने अभिनेत्री रविना टंडन जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी बल्लारपूर-कारवा पर्यटन क्षेत्रात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन या नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटन सफारीचा आनंद लुटण्यासाठी आल्या असून काल, रविवार १६ फेब्रुवारीला राज्याचे माजी वनमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत बल्लारपूर-कारवा वनपरिक्षेत्रातील पर्यटन सफारी करीत जंगल सफारीचा आनंद लुटला.चंद्रपूर जिल्ह्यात केवळ ताडोबा नव्हे,तर इतर वनक्षेत्रातदेखील वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. सोबत बिबट,अस्वल, राणकुत्रे, रानगवा,हरण,चितळ, सांबर,रानमांजर यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.मात्र,इतर वनविभागात वनपर्यटनाची सुविधा उपलब्ध नसल्याने ताडोबामध्ये पर्यटक सफारीचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. त्यातच बॉलिवूड सह क्रिकेटर व इतर मोठ-मोठ्या सेलिब्रिटिंची पर्यटनासाठी रेलचेल असते.अशातच मध्यचांदा वनविभागाने बल्लारपूर-कारवा या क्षेत्रात आगळीवेगळी अशी पर्यटन सफारी सुरू केली आहे. राज्याचे माजी वनमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन यांना बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा येथे जंगल सफारी घडविली.जंगल पर्यटन करत असतांना, त्यांना इरिना वाघिणीचे दर्शन घडले.व्याघ्र दर्शनाने त्या चांगल्याच सुखावल्या.त्यांना प्रत्यक्ष व्याघ्र दर्शन घडल्याने जंगल सफारी यशस्वी झाल्याचे समाधान व्यक्त केले.जंगल पर्यटन झाल्यावर त्यांनी वाघाबाबतची माहिती वन अधिकारी यांचेकडून जाणून घेतली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!