Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीयेत्या १९ फेब्रुवारीला गडचिरोलीत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन..

येत्या १९ फेब्रुवारीला गडचिरोलीत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती येत्या बुधवार १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार असून,या निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची पदयात्रा सकाळी ७.३० जिल्हा परिषद हायस्कूल येथून प्रारंभ होईल आणि इंदिरा गांधी चौक,कारगील चौक,आय.टी.आय.चौक,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,शासकीय विश्रामगृह,कॉम्प्लेक्स समोरील उद्यान येथे समाप्त होईल.या पदयात्रेमध्ये विद्यार्थी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्थानिक नागरिकांनीही सकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी रोड येथे उपस्थित राहून पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आज,सोमवारी नियोजनाचा आढावा घेत पदयात्रेचा मार्ग ठरविणे,विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करणे, क्रीडांगण सुसज्ज ठेवणे आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी सर्व विभागांशी समन्वय साधत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!