Friday, August 7, 2026
Homeभंडाराजंगल परिसरात मृतावस्थेत आढळून आला वाघ.. - मृत वाघाच्या तोंडावर,मानेवर व मागील...

जंगल परिसरात मृतावस्थेत आढळून आला वाघ.. – मृत वाघाच्या तोंडावर,मानेवर व मागील पायाला जखमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गुरे चराईसाठी जंगल परिसरात गेलेल्या गुराख्यास वाघ मृतावस्थेत दिसून आल्याने त्याने याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता मृत वाघ हा नर असून त्याचे वय अंदाजे ४ ते ५ वर्षे असल्याचे निदर्शनास आले. मृत वाघाच्या तोंडावर,मानेवर व मागील पायाला जखमा असल्याचे दिसून आले.तसेच मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे देखील निदर्शनास आले. सदरची घटना ही भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा नियतक्षेत्र सीतासावंगी कक्ष क्रमांक-६५ मधील असून आज,सोमवार १७ फेब्रुवारीला सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.सदर मृत वाघाचे शव वनाधिकारी यांनी ताब्यात घेतले असून,सूर्यास्त झाला असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असलेल्या चमूमार्फ़त उद्या १८ फेब्रुवारीला सकाळी मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.सदर मृत वाघाच्या शरीरावर असलेल्या जखामांवरून वाघाचा झुंजीत मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.वाघाचे मृत्यू कशामुळे झाले हे उद्याला शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!