- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वाहनांच्या चेकपोस्टवर चंद्रपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक मोटर निरीक्षक व एका खासगी कर्मचाऱ्याला ५०० रुपयांची लाच भोवली. प्रकरणी चंद्रपुरातील तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना
रंगेहात अटक केली.
माहितीनुसार,आदिलाबाद ते चंद्रपूर मार्गावर तेलंगणातील आदिलाबाद येथील तक्रारदाराचे हा ट्रक नियमित चालत असतात.अशातच घटनेच्या वेळी कर्तव्यावर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते आणि त्याचा खासगी कर्मचारी जगदीश डफडे उपस्थित होते.यावेळी तेलंगणा सीमेवर ट्रकला थांबवून कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली.सर्व कागदपत्रे बरोबर असतांना व गाडीचे वजन बरोबर असतांनाही एन्ट्रीच्या नावाखाली ५०० रुपये लाचेची मागणी केली.वारंवार हा प्रकार या ठिकाणी सुरू असल्यामुळे तक्रारदारांनी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागत तक्रार दाखल केली.ही रक्कम देण्याचे ट्रक चालकाने मान्य करून ५०० रुपये दिले.चंद्रपुरातील तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे स्वीकारतांना सहाय्यक मोटर निरीक्षक शिवाजी विभुते व खाजगी कर्मचारी जगदीश डफडे याला ५०० रुपयांची लाच घेतांना अटक केली.सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व खाजगी कर्मचाऱ्याला ताब्यात घेत्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता कार्यालयात ५६ हजार रुपये सापडले. सापडलेल्या रकमेबाबत त्यांनी कुठलेही सबळ स्पष्टीकरण न दिल्याने सदरचे पैसेही जप्त करण्यात आले आहेत.सदरची कारवाई अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपुरात केल्याने चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
- Advertisement -

