Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आकांक्षीत तालुका कार्यक्रम आढावा.. - सिरोंचा येथे आढावा बैठक...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आकांक्षीत तालुका कार्यक्रम आढावा.. – सिरोंचा येथे आढावा बैठक संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आकांक्षीत तालुका कार्यक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सिरोंचा तालुक्याच्या अती दुर्गम भागात आरोग्य सुविधांची पाहणी करीत आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. आरोग्याच्या सोई सुविधा संदर्भात माहिती घेतली आणि सुरू असलेल्या पायभूत सुविधा तात्काळ पूर्ण कराव्यात,अशा सूचना दिल्या.सोबतच शाळा, अंगणवाडी यांना भेटी देऊन शिक्षण आणि पोषण संबंधित सखोल चौकशी केली व संबंधित विभागाला सेवा उत्कृष्ठ पद्धतीने द्यावे अशा सूचना दिल्या.
सोबतच पंचायत समिती सिरोंचा येथे भेट देऊन आकांक्षीत तालुका कार्यक्रम संदर्भात सर्व विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेतली.बैठकीत आरोग्य, शिक्षण,पोषण,पायाभूत सुविधा,कृषी आणि सामाजिक विकास यासारख्या महत्त्वाच्या विभागांच्या निर्देशकांचा सखोल आढावा घेण्यात आला व गट विकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा यांना आकांक्षीत तालुका कार्यक्रमाकडे प्राथमिकता देऊन निर्देशांक वाढण्यासंदर्भात सूचना दिल्या .
बैठकीदरम्यान,संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून आकांक्षीत तालुका सिरोंचा मधील स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या योजनांची अंमलबजावणी करण्यावर विचारविनिमय झाला.
आकांक्षीत तालुका यादीतून बाहेर काढण्यासाठी  आश्वासन👇
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद गडचिरोली यांनी सिरोंचा तालुक्याला आकांक्षीत तालुका यादीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच,स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करून विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन केले.
या भेटीमुळे स्थानिक प्रशासनाला नव्या संकल्पनांचा आधार मिळाला असून, आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत सिरोंचा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.आढावा बैठकीस गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोलीचे डॉ.प्रताप शिंदे,श्रीकृष्ण पेंदाम गटविकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा,निलकंठम दोन्थुला गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सिरोंचा,आकांक्षीत तालुका फेलो शेषराव नागमोती सह सर्व विभाग प्रमुख तथा कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!