Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीसरपंचा विरुद्ध अविश्वास प्रस्ताव; पदावरून खाली.. -आरमोरी तालुक्याच्या देलोडा ग्रामपंचायतीतील प्रकार...

सरपंचा विरुद्ध अविश्वास प्रस्ताव; पदावरून खाली.. -आरमोरी तालुक्याच्या देलोडा ग्रामपंचायतीतील प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील देलोडा बु.ग्रामपंचायतीचे सरपंच डंबाजी हुलके यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी इतर आठ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला.प्रस्ताव ८ विरुद्ध शून्य मतांनी पारित झाल्याने सरपंच हुलके यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.देलोडा बु.येथील सरपंच हुलके यांच्यावर उपसरपंच प्रमोद भोयर व इतर ७ सदस्यांनी सरपंच आपल्या पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करतात,गावातील विकासकामे खुंटलेली असून सरपंच विश्वासात न घेता मनमानीने कामे करीत असल्याचा ३० सप्टेंबरला आक्षेप घेतला होता.याअंतर्गत आरमोरी तहसीलदारांनी नोटीस काढून काल,शुक्रवारी दुपारी १२ वाजता देलोडा बु.येथील ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास प्रस्तावाबाबत विशेष सभा आयोजित केली होती.तत्पूर्वी सरपंच हुलके यांनी आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे गुरुवारी  सरपंच पदाचा राजीनामा सोपविला.मात्र राजीनामा मंजूर होण्यापूर्वीच ग्रामपंचायत कार्यालय देलोडा बु. येथे तहसीलदार उषा चौधरी यांच्या उपस्थितीत विशेष सभा आयोजित करण्यात आली.सभेमध्ये सरपंच हुलके यांच्या विरोधात ८ सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केल्याने सरपंच हुलके यांना पदावरून खाली व्हावे लागले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!