Thursday, April 30, 2026
Homeगोंदियाअचानक पानटपरीवर चर्चा झाली अन् खुनाचा झाला उलगडा... -सिनेस्टाइल तपास करीत पोलिसांनी...

अचानक पानटपरीवर चर्चा झाली अन् खुनाचा झाला उलगडा… -सिनेस्टाइल तपास करीत पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एखाद्या चित्रपट वा क्राईम पेट्रोलमध्ये सुरुवातीला अज्ञात इसमाकडून खून केल्या जातो व नंतर पोलीस प्रशासन जीवाचे रान करून,एक-एक धागा जोडून आरोपीला बेड्या ठोकतात; तशाच प्रकारची घटना गोंदिया शहरात उघडकीस आली आहे.खून केल्याचे ना कुठे वाच्यता,ना कोणत्या पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार; असे असतानाही केवळ पानटपरीवर त्रयस्थ(तिसरा) व्यक्ती चर्चा करीत असताना,त्या चर्चेच्या आधारे पोलिसांनी खुनाचा आणि खून करणाऱ्यांचा छडा लावला आहे.शांतनू पशिने वय ३६ वर्षे,रा.नूरी चौक, सिव्हिल लाइन असे मृताचे नाव आहे.हत्या करणारे दुसरे कुणी नसून मृताचा गाडीमालक,मालकाची पत्नी आणि मुलगा निघाला.अगदी सिनेस्टाइल तपास शहर पोलिसांनी केल्याने शहर पोलिसांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
गोंदिया शहरातील गौतमनगर परिसरात ६ ते ७ लोकांनी मिळून एका इसमाचा खून करून त्याचा मृतदेह जंगलात जमिनीत पुरल्याची चर्चा ३० सप्टेंबरला गौतमनगरातील पानटपरीवर सुरू होती.ती चर्चा शहर पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकली. त्यानंतर ही माहिती पोलिस उपनिरीक्षक घनश्याम थेर यांच्यामार्फत शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर पर्वते यांना दिली.त्यांनी सदर प्रकरण गांभिर्याने घेत आपल्या अधिनस्थ पथकासह संपूर्ण परिसर पिंजून काढला.अशातच पक्क्या माहितीवरून त्यांच्या पथकासह मध्यरात्री गौतमनगर गोंदियाच्या दक्षिण दिशेतील स्मशानभूमीमधील झुडपी जंगल पिंजून काढला.ज्या ठिकाणी खड्ड्यात मृतदेह पुरला होता तिथे शोध घेऊन मृतदेह रितसर दंडाधिकाऱ्यांसमक्ष सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून खड्याबाहेर काढला.संपूर्ण तपास पूर्ण करून हत्या करून पुरावा नष्ट करणारे विक्रम उर्फ विक्की पवनसिंग बैस वय ३६ वर्षे,किरण विक्रम बैस वय ३२ वर्षे आणि चिता विक्रम बैस वय १९ वर्षे,सर्व रा.गौतमनगर, पती-पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार किशोर पर्वते, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम,धीरज राजुरकर,उपनिरीक्षक मंगेश वानखडे,अक्षय चन्नावार, घनश्याम धेर, पोलिस अंमलदार भाटिया,शेख, भेंडारकर, टेंभरे,बिसेन,चव्हाण,लोंदासे,सोनवाणे, इंदुरकर, रावते,बारेवार, बिसेन,लांजेवार यांनी केला.
शांतनू पशिने हा विक्रम बैस यांच्या चारचाकी कारवर चालक म्हणून कामाला होता.शांतनूने मालक विक्रम बैस याच्याकडून ८० हजार रुपये उधार घेऊनही कामावर येत नव्हता.त्यामुळे विक्रम बैस,त्याची पत्नी किरण बैस,मुलगा चित्ता बैस व त्यांच्या इतर साथीदारांनी शांतनूला गौतमनगर स्मशानभूमीच्या झुडपी जंगलात नेऊन उधारीचे पैसे परत करीत नाही व कामावरही येत नाही,म्हणून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.यात त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती होऊ नये,म्हणून रात्रीच्यावेळी गौतमनगर स्मशाभूमीलगतच्या झुडपी जंगलात ५ फूट खोल खड्डा खोदून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला होता.
मृतदेहाचे छायाचित्र परिसरातील लोकांना दाखविण्यात आले.दरम्यान त्यातील काही व्यक्तींनी तो व्यक्ती गौतमनगरातील विक्रम बैस यांचा चालक असल्याचे सांगितले.त्यानंतर विक्रमबाबत चौकशी केली असता,तो आपल्या कुटुंबासोबत घराला कुलूप लावून फरार असल्याचे समजले.तसेच विक्रम बैस याच्यासोबत राहणारे इतरही फरार असल्याचे चौकशीत आढळले, त्यामुळे त्यांचा हत्येशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आला.त्या दिशेने तपास करून विक्रम बैसचा मित्र विकास ओमप्रकाश गजभिये याला पकडले.दरम्यान त्याने मृत शांतनूच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगून हत्येच्या गुत्थीची उकल केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!