Thursday, August 27, 2026
Homeगोंदियादारू शौकिनाने दारू पिण्यासाठी चक्क घरातील ताट व भांडे ठेवले गहाण....

दारू शौकिनाने दारू पिण्यासाठी चक्क घरातील ताट व भांडे ठेवले गहाण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-दारू पिण्यासाठी कधी कोण,काय करणार याचा नेम नाही.एकदा दारूचे व्यसन जडले की,सहसा सुटण्याचे नावच घेत नाही.खिशात पैसा असला की, ‘येरे ढवळ्या अन् पेरे पवळ्या’ अशी अनेकांची गत झाली आहे.दारुसाठी जुगाळ करून बरोबर आपली तहान भागवतांना अनेकजण दिसून येतात.अशातच दारुसाठी पैसे तसेच जुगाळ जमले नाही; तर अट्टल तळीराम घरातील साहित्य विकून शौक पूर्ण करीत असतात. असाच प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथे उघडकीस आला आहे.एका दारू शौकिनाने दारू पिण्यासाठी चक्क नवऱ्याने घरातील ताट व भांडे गहाण ठेवले,तर ते भांडे परत आणण्यासाठी गेलेल्या त्याच्या पत्नीला महिलेने मारहाण केली.गोरेगाव तालुक्याच्या तिल्ली मोहगाव येथे बुधवारी  सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सिंधू टेंभुर्णीकर यांना घरी स्टीलची बकेट,ग्लास व ताट दिसून आले नाही.यावर त्यांनी पती जयकुमार याला फोन करून सामानासंदर्भात विचारणा केली. जयकुमार याने ते भांडे मीना संतोष कोचे वय ५२ वर्षे हिला दिल्याचे सांगितले.त्यानुसार,सिंधू टेंभुर्णीकर भांडे परत आणण्यासाठी मीना कोचे हिच्या घरी गेली व आपले भांडे आणत असता तुझ्या नवऱ्याला दारू पिण्यास मी बोलवतो का? असे म्हणत मीनाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली.या घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसांनी मीना कोचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३२ (सी),२९६,११५ (२),३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस नायक लांजेवार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!